TRENDING:

BMC Election : ठाकरे बंधुंच्या युतीचा पहिला फटका, मनसेचा माजी नगरसेवक नॉटरिचेबल, नेमक काय घडलं?

Last Updated:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर ठाकरे बंधुची युती झाली आहे. या युतीनंतर अद्याप दोघांनी जागावाटप जाहीर केले नाही आहे. पण या जागावाटपाआधी ठाकरे बंधुंच्या युतीचा पहिला फटका बसला आहे. मनसेचा माजी नगरसेवक अचानक नॉटरिचेबल झाला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Municipal Election 2026 News : मुंबई :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर ठाकरे बंधुची युती झाली आहे. या युतीनंतर अद्याप दोघांनी जागावाटप जाहीर केले नाही आहे. पण या जागावाटपाआधी ठाकरे बंधुंच्या युतीचा पहिला फटका बसला आहे. मनसेचा माजी नगरसेवक अचानक नॉटरिचेबल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे हा माजी नगरसेवर नेमका कोण आहे? व तो अचानक नॉटरिचेबल का झाला आहे? हे जाणून घेऊयात.
raj thackeray udhhav thackeray
raj thackeray udhhav thackeray
advertisement

मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 या दोन जागांवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना युबीटी आणि मनसेमध्ये वाद होता. पण या वादावर तोडगा काढत वॉर्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे तर वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. पण मनसेकडून वॉर्ड क्रमांक 194 मधून माजी नगरसेवक संतोष धूरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता हा वॉर्ड जागा वाटपात ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे संतोष धूरी यांची पुर्ती कोंडी झाली आहे. त्यामुळे आपल्याला तिकीटावर पाणी सोडावे लागणार असल्याने संतोष धूरी नॉटरिचेबल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हा नॉटरिचेबल मनसेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

advertisement

संतोष धुरींची नाराजी दुर करण्यासाठी मनसेकडून हालचाली

संतोष धुरी नाराज असल्याचे कळताच मनसे नेतेसंदीप देशपांडे यांनी उद्या शिवतीर्थावर सकाळी 10.30 वाजता भेटण्यासाठी बोलावलं आहे. या भेटीत संतोष धुरी यांची नाराजी दुर केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान जागावाटपात वॉर्ड नंबर 192 मधून राज ठाकरे यांच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवणार असल्याची देखील माहिती आहे.

advertisement

ठाकरे बंधूंच्या मुंबईत युती करण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झालं.ठाणे,कल्याण-डोंबिलीत ठाकरे एकत्रितपणे मैदानात उतरणार आहेत.पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत.तिथं काँग्रेसला सोबत घेण्याची शक्यता आहे.नाशिकमध्येही एकत्र लढण्यावर ठाकरेंचं एकमत झालंय.तर छत्रपती संभाजीनगर ध्येही एकत्र लढण्यावर ठाकरेंचं एकमत झालंय. जास्तीत जास्त ठिकाणी युती हेच ठाकरेंचं धोरण असणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: शेतकरी मालामाल होणार, शेवगा बाजारात तेजी; आले, गुळाचे भाव काय?
सर्व पहा

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election : ठाकरे बंधुंच्या युतीचा पहिला फटका, मनसेचा माजी नगरसेवक नॉटरिचेबल, नेमक काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल