TRENDING:

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी गुड न्यूज, नांदेड–मुंबई विमानसेवेचा मुहूर्त निघाला, या दिवशी होणार सुरू

Last Updated:

मराठवाड्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी नांदेड–मुंबई हवाईसेवा अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठवाड्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी नांदेड–मुंबई हवाईसेवा अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मुंबईसाठी थेट हवाई संपर्क नसल्यामुळे नांदेडकरांसह हिंगोली, परभणी, लातूर, वाशीम आणि यवतमाळ या भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर या सेवेचा प्रारंभ हा स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा मुद्दा बनला होता.
मराठवाड्यासाठी दिलासादायक अपडेट: नांदेड–मुंबई हवाई सेवेला मुहूर्त निघाला या दिवस
मराठवाड्यासाठी दिलासादायक अपडेट: नांदेड–मुंबई हवाई सेवेला मुहूर्त निघाला या दिवस
advertisement

खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. 8) त्यांच्या फेसबुक पेजवरून माहिती देत सांगितले की, 25 डिसेंबरपासून नांदेड–मुंबई–नांदेड ही हवाईसेवा सुरू होणार असून, याला त्यांनी ख्रिसमसची भेट असे संबोधले आहे. यापूर्वी 15 नोव्हेंबरपासून सेवा सुरू होणार असल्याची घोषणा झाली होती मात्र ती प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती.

केदारनाथच्या पुरात वाहून गेला, 10 वर्षानंतर थेट पुण्यात जिवंत सापडला, शिवम सोबत काय घडलं?

advertisement

हवाई सेवेची मागणी का वाढली?

दीड वर्षापूर्वी स्टार एअरमार्फत नांदेडहून विविध शहरांना हवाईसेवा सुरू झाली. पण मुंबईचा समावेश नसल्याने सतत नाराजी व्यक्त केली जात होती. पूर्वी इतर कंपन्यांच्या उड्डाणांमध्ये मुंबई सेवा नियमित होती. मात्र या वेळी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर परिस्थितीत बदल झाला आणि सेवेबद्दलची अपेक्षा पुन्हा वाढली.

advertisement

सेवा कशी असणार?

खासदार चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे, 25 डिसेंबरपासून आठवड्यात तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार उड्डाणे होणार आहेत. पुढे सेवा दररोज सुरू करण्याचा मानस आहे. स्टार एअरने या मार्गाची जबाबदारी स्वीकारली असून कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उड्डाणाच्या नेमक्या वेळा अद्याप घोषित झालेल्या नाहीत.

advertisement

कोणाला होणार फायदा?

या सेवेचा फायदा फक्त नांदेडपुरता मर्यादित नसून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना होणार आहे. हिंगोली, परभणी, लातूर, वाशीम, यवतमाळ येथील प्रवाशांचे मुंबईशी अंतर कमी होणार आहे. सध्या नांदेडहून दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या पाच मार्गांवर सेवा उपलब्ध आहे. मुंबई सेवा सुरू झाल्यानंतर मार्गांची संख्या सहा होईल. तसेच गोव्याला थेट सेवा सुरू करण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

advertisement

स्टार एअरचे संचालन कायम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अर्धा एकरमध्ये 350 झाडांची लागवड, शेतकऱ्याचा पपईचा प्रयोग यशस्वी, 3 लाखांची कमाई
सर्व पहा

नांदेडहून सुरू असलेल्या सर्व मार्गांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करते आणि मुंबई सेवेची जबाबदारीसुद्धा तिनेच घेतली आहे. 25 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे मराठवाड्यातील हवाई संपर्क आणखी मजबूत होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी गुड न्यूज, नांदेड–मुंबई विमानसेवेचा मुहूर्त निघाला, या दिवशी होणार सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल