Mumbai : फटा पोस्टर निकला चोर! नंबर प्लेटला ग्रीस लावली, पण... मुंबई पोलिसांनी 24 तासात डाव उलटवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
फाटलेल्या पोस्टरवरून मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोराला पकडलं आहे. इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं कौतुक होत आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : फाटलेल्या पोस्टरवरून मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोराला पकडलं आहे. इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं कौतुक होत आहे. बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये 63 वर्षीय महिलेची 25 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती. चेन चोरल्यानंतर चोरटे रिक्षा घेऊन पळून गेले.
चोरी केल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये रिक्षाची नंबर प्लेट दिसू नये, म्हणून चोर नंबर प्लेट ग्रीस लावून झाकायचे, त्यामुळे पोलिसांना रिक्षा सापडण्यात अडचण येत होती, पण सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना रिक्षावर लावलेला एक फाटलेला पोस्टर दिसला, ज्याचा वापर पोलिसांनी चोर शोधण्यासाठी केला.
advertisement
आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी फाटलेल्या पोस्टरची ही रिक्षा शोधली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी फक्त 24 तासांमध्ये दहिसर पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथून दोन्ही सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली आहे.
एमएचबी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संजीव मुरलीधर गुप्ता (वय 43) आणि रिक्षाचालक राजनारायण छोटेलाल शर्मा (वय 35) यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे केलेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
मीट ग्राईंडरमधून सोनं जप्त
दरम्यान मुंबई विमानतळावरून डीआरआयने 2.89 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. हे सोनं सौदी अरेबियामधून मीट ग्राईंडरमध्ये लपवून आणलं जात होतं. याबाबतची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने सौदी अरेबियामधून आलेल्या कुरिअर शिपमेंटची झडती घेतली, ज्यात त्यांना सोन्याचे 32 तुकडे मिळाले. याप्रकरणी डीआरआयने दोन जणांना अटक केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 7:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : फटा पोस्टर निकला चोर! नंबर प्लेटला ग्रीस लावली, पण... मुंबई पोलिसांनी 24 तासात डाव उलटवला!








