advertisement

Instagram Feature : इन्स्टाग्रामचं हे फिचर वापरुन बघा, रील्सचा रीच वाढवण्यासाठी ठरेल उपयुक्त

Last Updated:

आजच्या काळात रील्स ओळख आणि रीच मिळवण्याचं एक प्रमुख माध्यम बनलंय. तेव्हा असे ट्रेंड कंटेंट क्रिएटर्ससाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. त्यातलंच एक फिचर म्हणजे लिप-सिंकिंग. व्हिडिओमधील ओठांच्या हालचाली तुमच्या आवाजाशी पूर्णपणे मॅच होतात. यासाठी आधी एडिटिंग ॲप्स वापरले जायचे, पण इंस्टाग्रामनं हे फिचर आणल्यानं ते काम आणखी सोपं केलं आहे.

News18
News18
मुंबई : इंस्टाग्रामचे कोट्यवधी युजर्स आहेत. लाखो कंटेट क्रिएटर्स, कोट्यवधी फॉलोअर्सची ही दुनिया. तुम्हीही  इंस्टाग्राम वापरत असाल तर एका स्मार्ट फिचरशी ओळख करुन घेऊया, जेणेकरुन तुमचे रील्स आणखी प्रोफेशनल दिसू शकतील.
आजच्या काळात रील्स ओळख आणि रीच मिळवण्याचं एक प्रमुख माध्यम बनलंय. तेव्हा असे ट्रेंड कंटेंट क्रिएटर्ससाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. त्यातलंच एक फिचर म्हणजे लिप-सिंकिंग. व्हिडिओमधील ओठांच्या हालचाली तुमच्या आवाजाशी पूर्णपणे मॅच होतात. यासाठी आधी एडिटिंग ॲप्स वापरले जायचे, पण इंस्टाग्रामनं हे फिचर आणल्यानं ते काम आणखी सोपं केलं आहे.
advertisement
यासाठी ट्रेंडमधे, तुम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि नंतर आवाज अशा प्रकारे सेट करू शकता की तो ओठांशी मेळ घालणारा असेल. इंस्टाग्रामवर रील शेअर करताना, ट्रान्सलेट रील किंवा ट्रान्सलेशन पर्याय असतो. याचा योग्यरित्या वापर केला तर, आवाज आणि भाषेनुसार लिप-सिंक आपोआप सुधारतं. तसंच एआयच्या मदतीनं भाषांतरित आवाज क्रिएटरच्या लिप मुव्हमेंटशी जुळवता येतो.
advertisement
रील अपलोड करणार असाल, तेव्हा ट्रान्सलेट रील पर्याय चालू करा. तिथे include lip synching - इनक्लुड लिप सिंक स्विच दिसेल; तो नक्की चालू करा. रीलचा ऑडिओ कोणत्या भाषेत रेकॉर्ड केला आहे ते निवडा. एकदा तुम्ही ही सेटिंग सेव्ह केली की, व्हिडिओचा आवाज आणि ओठांच्या हालचाली एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळतील.
advertisement
कधीकधी, रील अपलोड केल्यानंतर, वेगळी भाषा वापरणं अधिक योग्य ठरेल. सुदैवानं, इंस्टाग्राममधे हे फिचरही आहे. रील सेटिंग्जमध्ये नंतर भाषा बदलू शकता आणि लिप-सिंकिंग एडजस्ट करू शकता.
हा ट्रेंड इतका लोकप्रिय का होतोय समजून घेऊया. कारण यामुळे व्हिडिओ अधिक प्रोफेशनल दिसतात.
स्पष्ट आणि सुसंगत आवाजामुळे फरक पडतो. फॅशन, सौंदर्य आणि प्रॉडक्टचा रिच दुपटीनं वाढतो. यामुळे जास्त एडिटिंग न करता रिल चांगलं दिसतं.
advertisement
हा नवीन इंस्टाग्राम लिप-सिंकिंग ट्रेंडमुळे कमीत कमी प्रयत्नात हाय क्वालिटीचे रील्स तयार करता येतात. योग्य सेटिंग्जसह, आवाज आणि व्हिडिओ मॅच होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Instagram Feature : इन्स्टाग्रामचं हे फिचर वापरुन बघा, रील्सचा रीच वाढवण्यासाठी ठरेल उपयुक्त
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement