advertisement

शाहरुख गाजवणार 2026 चा शेवट, 'किंग'ची रिलीज डेट फिक्स; पण रणबीरच्या 'रामायण'पासून 40 हात दूर

Last Updated:

शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. सिनेमाची रिलीज डेटही फिक्स करण्यात आली आहे.

News18
News18
शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित "किंग" सिनेमाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे.  शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सिनेमाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या किंगच्या टीझर शेअर करत त्याचा मुलगा आर्यन खान याने दिलेली रिअँक्शन देखील चर्चेत आली आहे.
45 सेकंदांच्या टीझरची सुरुवात 'इट्स टाइम टू रॉर' या वाक्यानं होतेय. बर्फाळ दऱ्यांमध्ये कॅमेऱ्याकडे पाठमोरा शाहरुख खान दिसतो. त्यानंतर काचेच्या छताला तोडून शाहरुख खानची दमदार एन्ट्री होते. रक्ताने माखलेले 'किंग' हे टायटल दिसतं आणि 24.12.2026 ही रिलीज डेट दिसते.
advertisement
डर नही दहशत म्हणत शाहरुख खान कोणाला तरी मुक्का मारतो. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. रिलीज तारखेच्या घोषणेचा टीझर शेअर करताना शाहरुखने लिहिले, "किंग गर्जना करायला तयार आहे. 24.12.2026 पासून थिएटरमध्ये." #It'sKingTime #KingDateAnnouncement . 'किंग' चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. सिद्धार्थ आणि शाहरुख खान यांचा हा दुसरा सिनेमा आहे. त्यांनी यापूर्वी 'पठाण' मध्ये एकत्र काम केले होते.
advertisement
शाहरुखचा किंग 2026 च्या ख्रिसमसला रिलीज होईल. हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी रिलीज होऊ शकला असता, परंतु नितेश तिवारी यांच्या 'रामायण' मुळे तो ख्रिसमसला ढकलण्यात आला आहे. रामायण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो. रामायण हा सिनेमा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकतो. दोन्ही सिनेमांच्या रिलीजमध्ये जवळपास 40 दिवसांचं अंतर आहे.
advertisement
'किंग' सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. या सिनेमातून शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच ऑनस्क्रिन दिसणार आहे. सिनेमात दीपिका पदुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, अर्शद वारसी, अभय वर्मा आणि राघव जुयाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
सिनेमाचा टीझर शेअर करत शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने एका शब्दांत रिअँक्शन देत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखने इन्स्टाग्रामवर किंगचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये 'बाप' असं लिहिलं आहे. आर्यनची ही बाप कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरुख गाजवणार 2026 चा शेवट, 'किंग'ची रिलीज डेट फिक्स; पण रणबीरच्या 'रामायण'पासून 40 हात दूर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement