नवी मुंबईतील धक्कादायक प्रकरण
विनोद तुपसौंदर (वय 27) असे मृत तरुणाचे नाव असून तो रबाळे येथील साईनगर परिसरात वास्तव्यास होता. जून महिन्यात विनोदचे लग्न नाशिक येथील वैष्णवी नाटकर (वय 25) हिच्याशी झाले होते. लग्नानंतर काही काळ दोघेही एकत्र राहत होते. मात्र अलीकडच्या दिवसांत त्यांच्यात सतत वाद होऊ लागले होते.
नात्यांना काळिमा
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ही तिच्या मामा संतोष ढगे याच्याशी मोबाईलवरून वारंवार कॉल आणि चॅटिंग करत होती. ही बाब विनोदच्या लक्षात येताच त्यांच्यात वाद वाढले. या वादातून वैष्णवी रागावून माहेरी निघून गेली होती. त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आल्याचा प्रकार घडला. हे व्हिडीओ संतोष ढगे यानेच पाठवल्याचा संशय विनोदच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे विनोद मानसिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली होता. सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून 25 सप्टेंबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी आणि तिच्या मामाकडून होत असलेल्या मानसिक छळामुळेच विनोदने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
