ही घटना मागील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी घडली होती. समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघेही घराजवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले. तेव्हा समीर यांनी चालकाला गाडी आणायला सांगितलं.
तेव्हा चालकाने गाडी आणत असताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला. यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यात समीर खान यांना मल्टिफॅक्चर झाले होते.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑपरेशनानंतर समीर यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान समीर खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
advertisement
जावयाच्या मृत्यूनंतर नवाब मलिक यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2024 6:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thar आऊटऑफ कंट्रोल झाली अन् समीर खान यांना चिरडलं, त्या दिवशीच्या अपघाताचा VIDEO
