या त्रासातून कायमस्वरूपी मुक्ती मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका पोयसर नदीवर एक नवा पूल बांधणार आहे. या पुलामुळे मालाड आणि अंधेरी यांच्यातील अंतर पार करण्यासाठी फक्त 6 मिनिटे लागतील
अंधेरी-मालाड कनेक्टिव्हिटीची नवी योजना
अंधेरी आणि मालाड ही दोन्ही मुंबईतील अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. ही दोन्ही उपनगरे व्यावसायिक आणि व्यापारी कामांसाठीची मोठी केंद्रे आहेत. अंधेरीमध्ये अनेक मोठी कार्यालये, औद्योगिक भाग आणि व्यावसायिक इमारती आहेत. तर, मालाड हे आयटी कंपन्यांचे मोठे केंद्र बनले आहे. याशिवाय मालाडमध्ये अनेक चित्रपट आणि जाहिरातींचे स्टुडिओ देखील आहेत. त्यामुळे रोज लाखो लोक कामासाठी या दोन्ही भागांमध्ये ये-जा करत असतात.
advertisement
यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होते आणि वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. अंधेरी आणि मालाड भौगोलिकदृष्ट्या खूप जवळ आहेत.मात्र, त्यांच्यामध्ये पोयसर नदी आणि मालाड खाडी येते. या कारणामुळे दोन्ही भागांना थेट जोडणारा रस्ता नाही. सध्या वाहनचालकांना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करण्यासाठी लिंक रोड मार्गे खूप मोठा वळसा घ्यावा लागतो. या वळसा घालून प्रवास करण्यासाठी सध्या किमान एक तास लागतो.
कसा असेल पोयसर नदीवरील पुलाचा नवा मार्ग?
पोयसर नदीवर नवा पूल बांधल्यामुळे ही समस्या कायमची सुटणार आहे. हा पूल तयार झाल्यावर मालाड आणि अंधेरीमध्ये थेट संपर्क साधला जाईल. ज्यामुळे 6 मिनिटांत हे अंतर पार करणे शक्य होईल. यामुळे लोकांचा अमूल्य वेळ वाचेल आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
मुंबई महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर मालाड आणि अंधेरीच्या कनेक्टिव्हिटीत क्रांतिकारी बदल होईल. या नव्या मार्गामुळे प्रवास सुस्साट होईल. हा पूल नेमका कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल, याचा सविस्तर नकाशा लवकरच जाहीर होईल. मात्र,यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरांतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत होईल.