10वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
रेल्वे कोच फॅक्टरी ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील प्रमुख युनिट असून येथे विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिसची भरती सुरू आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, पेंटर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर या पदांचा समावेश आहे. या भरतीमुळे तरुणांना तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची आणि रेल्वे क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 असून 15 ते 24 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
advertisement
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा?
1)सर्वप्रथम www.rcf.indianrailways.gov.inया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2) त्यानंतर नवीन उमेदवारांनी नोंदणी (Registration) करून आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
3)नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करा.
4)अर्जामध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूकपणे भरा.
5)10वीची गुणपत्रिका आणि आयटीआय प्रमाणपत्र अपलोड करा.
6)त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज सबमिट करा.
7)भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून जतन करून ठेवा
