वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्ब्यांमध्ये वाढ
पश्चिम रेल्वेची देशातली 42 वी चालवली जाणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे. या ट्रेनचे डब्बे मार्च महिन्यापासून वाढवले जाणार आहेत. मार्च 2024 पासून 22969 डाऊन- 22961 अप मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ह्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशी दमदार प्रतिसाद देत आहेत. त्याच अनुषंगाने आता रेल्वेने डब्बे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांनंतर ट्रेनच्या आसन व्यवस्थेमध्ये पश्चिम रेल्वेने वाढ केलेली आहे. चार नवे एसी डबे जोडल्यानंतर एकूण आसन व्यवस्था 278 वर पोहोचेल. प्रवाशांच्या अनुषंगाने ही एक अर्थाने आनंदाची बातमीच म्हणता येईल.
advertisement
केव्हापासून डब्ब्यांची संख्या वाढणार
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्ब्यांमध्ये काही तात्पुरत्या दिवसांसाठीच वाढवले जात आहेत. 9 मार्च 2026 पासून ते 31 मार्च 2026 या दिवसांपुरतीच वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्ब्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनची पीक सीझनदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असतात. गर्दी कमी करून प्रवाशांना सुखद आणि सुलभ प्रवास करता यावा या करणाने तात्पुरती डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. जरीही ठराविक काळासाठी का होईना पश्चिम रेल्वेने ट्रेन सुरू केली असली तरीही प्रवाशांना थोड्या दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.
