ईडीला लिहीलेल्या पत्रातील आरोप
'मला तुमच्या निदर्शनास आणायचे आहे की, या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड मला सतत धमकावत आहेत आणि इतर साक्षीदारांनाही अशाच प्रकारे धमक्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. माझा जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात असून, या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांवर नोंदवलेले आरोप बदलण्यासाठी हा दबाव निर्माण केला जात आहे.' असा आरोप या पत्रात पाटकर यांनी केला आहे.
advertisement
उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र
'महिलांच्या सुरक्षेबाबत तुमच्या वक्तव्यामुळे मी खूश आहे, पण कोणतीही कारवाई झाली नाही. मी तुम्हाला 2016 ते 2021 या काळात अनेक ईमेल्स केले होते. ज्यामध्ये मी राऊत यांच्या धमक्या आणि मारहाणीच्या घटनांची माहिती दिली होती. त्यांनी माझ्या विरोधात लोकांच्या मदतीने माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी माझ्या कामात अडथळा आणला आणि माझा 'डॉक्टर रखमाबाई' हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. त्यामुळे तिचे आणि अनेक कलाकारांचे मोठे नुकसान झाल्याचा' आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर छेडछाड केल्याचा आरोपही, डॉ. स्वप्ना पाटकर यांनी,उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
