फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत मिळावी अशीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीकं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्यामुळे जिथे नुकसान होईल तिथे मदत मिळेल असं' फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
अवकाळीचा फटका
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका ज्वारी, गहू, हरभारा अशा रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. सोबतच ढगाळ वातावरणामुळे तुरी सारख्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगामात देखील पावसामुळे असमान प्रमाणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
