नवी मुंबई : नवी मुंबईत शिवाय हक्कांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अटल सेतू आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा विकास वेगाने वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढली असून मुंबईशी कनेक्टिव्हिटी खूप सोपी झाली आहे. यामुळे घरांच्या किंमतीही वाढल्या आहेत.
advertisement
सिडकोची प्राईम लोकेशनवर लॉटरी
सर्वसामान्यांसाठी आता सिकडोकडून स्वस्तात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. अटल सेतूपासून जवळ असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये फक्त 22 लाख रूपयांत घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. द्रोणागिरीत EWS फ्लॅट्सची किंमत अंदाजे 22.18 लाख रुपये असून LIG फ्लॅट्सची किंमत 30.17 लाख रुपये आहे. EWS फ्लॅट्स सेक्टर 11 आणि सेक्टर 12 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. LIG फ्लॅट्सही याच सेक्टर्समध्ये उपलब्ध आहेत. EWS फ्लॅट्सचा कारपेट एरिया 25.81 चौ. मीटर आहे, तर LIG फ्लॅट्सचा 29.82 चौ. मीटर आहे.
कधी पर्यंत करता येणार अर्ज?
तळोजा, खारघर या भागातही सिकडोकडून स्वस्त घर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2025 आहे. इच्छुकांनी सिडकोच्या वेबसाइट cidcofcfs.cidcoindia.com वर जाऊन अर्ज करावा. विशेष म्हणजे पीएमएवाय अंतर्गत पात्र EWS कॅटेगरीच्या अर्जदारांना 2.50 लाख रुपयांची सब्सिडीही मिळेल. ही संधी घर खरेदीसाठी उत्तम आहे आणि सामान्य लोकांसाठी स्वस्तात घर मिळवण्याचा मार्ग खुले करते.
