पंकजा मुंडे यांचा स्वकीय सहाय्यक
मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा पती हा एका नामांकित राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वीच डॉक्टर तरुणीने आपल्या पतीविरूद्धचे पुरावे वडिलांना व्हॉट्स अॅपद्वारे पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
पतीविरूद्धचे पुरावे वडिलांना व्हॉट्स अॅप
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते, या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. डॉक्टर गौरी यांना पतीची एका तरुणीसोबतची चॅटिंग सापडली होती. त्याचे स्क्रीनशॉट गौरी यांनी वडिलांना पाठवले होते. ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं समजत आहे.
मोबाईल चॅट अन् कॉल रेकॉर्डची तपासणी
दरम्यान, मुंबईतील वरळी भागातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेहाची पोस्टमॉर्टेमसाठी पाठवणी करण्यात आली आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. वरळी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
