TRENDING:

Panvel News : नियतीचा क्रूर खेळ! घरात मुलगा एकटा, घरातले परतले तेव्हा खोलीत दिसलं भयान दृश्य

Last Updated:

Panvel News : पनवेलच्या करंजाडे येथे 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून मानसिक तणाव होता का याबाबत पोलिस तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवीन पनवेल : गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुलांच्या आत्महत्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. ज्यात घरच्यांनी ओरडल्याने किंवा अभ्यासाचा दबाव, मैत्रीतील तणाव किंवा नैराशेत जाण्यामुळे अशा धक्कादायक घटना घडत असल्याचे अनेक प्रकरणांत दिसून आले आहे. या सर्वांमध्ये अशीच एक धक्कादायक घटना पनवेलमधून समोर आलेली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चर्चेत आलेले हे धक्कादायक प्रकरण पनवेलच्या करंजाडे येथील आहे. जिथे 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली असून या घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

चिराग पांचाल असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह करंजाडे परिसरात वास्तव्यास आहे. मुलाने घरातील लोखंडी अँगलला ओढनी बांधून त्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलाच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे

advertisement

चिरागने असे टोकाचे पाऊल उचलण्यामागे मानसिक दबाव होता का किंवा इतर कोणताही वाद याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.अचानक उचललेल्या या पावलामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याची कमाल, 30 गुंठ्यात 90 टन घेतलं ऊस उत्पादन, अख्खं गाव पाहतच राहिलं!
सर्व पहा

शाळा असो वा महाविद्यालयातील तणाव, सोशल मीडियाचा प्रभाव, घरातील वाद, मानसिक आरोग्याच्या समस्या यांसारख्या कारणांमुळे अल्पवयीनांमध्ये आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी समुपदेशनाच्या माध्यमातून संवाद वाढवणे आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Panvel News : नियतीचा क्रूर खेळ! घरात मुलगा एकटा, घरातले परतले तेव्हा खोलीत दिसलं भयान दृश्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल