TRENDING:

Mumbai Parking App : गाडी कुठे लावायची? हा प्रश्न आता सुटणार; घरबसल्या पार्किंग बुकिंग करता येणार

Last Updated:

Mumbai Parking App : मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी नवीन स्मार्ट पार्किंग ॲप लाँच करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या आपल्या गाडीसाठी जागा आरक्षित करता येईल. यामुळे पार्किंग शोधण्यासाठी होणारी वणवण थांबून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई शहरात वाहन बाहेर घेऊन जाताना पार्किंगची समस्या कायम असते. मात्र आता याचे टेन्शन राहणार नाही. मुंबई महापालिकेने पार्किंग पार्किंग ॲप्लीकेशन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता त्यांच्या गाडीसाठी शहरात कुठेही पार्किंग घरबसल्या आरक्षित करता येणार आहे. पण या प्रकल्पाचा शुभारंभ कधी करण्यात येणार आहे त्याबाबतची एक अपडेट समोर आलेली आहे.
सिनेमाच्या तिकिटाप्रमाणे आता पार्किंगही होणार ऑनलाईन आरक्षित
सिनेमाच्या तिकिटाप्रमाणे आता पार्किंगही होणार ऑनलाईन आरक्षित
advertisement

पार्किंगसाठी आता वणवण नको

मुंबई शहरात अनेक भागात पार्किंग उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेकदा रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यात वाहतूक पोलिसांकडून अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने वाहन चालकांना भुर्दंड सहन करावा लागतो,त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन महापालिकेने स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्यातच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

advertisement

कसा असेल हा प्रकल्प?

सुरुवातीला या 530 पार्किंग टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार आहे. हे पार्किंग परिसर क्षेत्र खाजगी कंपनीला दिल्यावर त्यांनी अॅप्लीकेशनद्वारे वाहनांना पार्किंगची जागा मिळवून देणे बंधनकारक असणार आहे, असे पालिकेने सांगितले आहे.

पार्किंगसाठी किती खर्च करावा लागणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेती करावी तर अशी, पारंपरिक पद्धतीला फाटा देत केली हुरडा ज्वारी लागवड, आता लाखांत कमाई
सर्व पहा

मुंबईत सुरु होणारे हे पार्किंग खाजगी भागीदारीतून चालवण्यात येणार असले तरी पार्किंग सुरु करताना त्यासाठी लागणारा दर हा मुंबई महानगरपालिका आणि खासगी संस्था एकत्रिरित्या ठरवणार आहे. मुंबईकरांची लुट होणार नाही याची विशेष खबरदारी ही घेण्याच येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Parking App : गाडी कुठे लावायची? हा प्रश्न आता सुटणार; घरबसल्या पार्किंग बुकिंग करता येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल