पण मृत्यूआधी रोहित आर्याने पोलिसांना वॉर्निंग दिली होती. आपल्याला काही जणांशी बोलायचं आहे. काही प्रशांची उत्तरं हवी आहेत. मी दहशतवादी नाही. माझं बोलणं झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येणार आहे, असं रोहित आर्या म्हणाला होता. शिवाय माझी मागणी पूर्ण झाली नाही. तर मी या स्टुडिओला आग लावणार असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं.
advertisement
रोहित आर्या नक्की काय म्हणाला?
"मी रोहित आर्या.. आत्महत्या करण्याऐवजी मी एक प्लॅन केला असून काही मुलांना होस्टेज बनवलं आहे. माझ्या जास्त काही मागण्या नाहीत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही जणांशी बोलायचं आहे. काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी दहशतवादी नाही. ना माझी काही पैशांची मागणी आहे. मला फक्त बोलायचं आहे. त्यासाठी मी या मुलांना ओलिस ठेवले."
"मी जिवंत राहिलो किंवा नाही राहिलो तरी हा प्लॅन यशस्वी होणार. मी एकटा नाही आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. मला फक्त बोलायचे आहे. अन्यथा मी या संपूर्ण जागेला आग लावणार आहे. यामध्ये मला काही झाले तर फरक पडणार नाही. पण विनाकारण मुलांना याचा त्रास होईल. याला फक्त संबंधित व्यक्तींना जबाबदार धरावे. माझे बोलणे झाल्यानंतर मी स्वतः बाहेर येणार आहे. मी फक्त बोलून त्यातून मार्ग काढणार आहे. कृपया मला विनाकारण डिवचू नका," असंही रोहित आर्या म्हणाला.
