या प्रकरणाचं लॉरेन बिश्नोई कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. 'ही लढाई व्हावी, अशी आमची इच्छा नव्हती पण तू आमच्या भावाचे नुकसान केले,' असे समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खान याला उद्देशून म्हटले आहे. अनुज थापन याचा बदला घेण्याकरिता बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा सोशल मीडियावरील लिहिलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणाचं जरी लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन समोर आलं असलं तरी देखील पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात जरी लॉरेन्स बिश्नोईचा अँगल नाकारला नसला तरी देखील विविध अँगलने तपास सुरू आहे. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी देखील हे कारस्थान असू शकतं असं पोलिसांना वाटत आहे. बांधकाम व्यवसायातील शत्रूत्वाचा अँगल देखील या प्रकरणात पोलिसांकडून तपासला जात आहे.