नराधम मजुराने घरात घुसून...
मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचे बांधकाम करणारे काही मजूर आपल्या कुटुंबासह तिथंच वास्तव्यास आहेत. पीडित मुलगी ही याच एका मजुरांपैकी एका मुलगी आहे. पण सोमवारी रात्री ती आपल्या घरी एकटीच असताना तिथं काम करणाऱ्या दुसऱ्या एका मजूराने पाहिले आणि तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
दोन तासांत नराधमाला अटक
चिमुकलीच्या वडिलांनीती कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने नौपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपीला दोन तासांच्या आत अटक केली. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून या आरोपीला फाशीची शिक्षा किंवा कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thane Crime : ठाणे हादरले! बाप कामावर अन् चिमुकली एकटी; नराधम मजुराने घरात घुसून केले कृत्य
