बैठकीमध्ये पोलिसांच्या घरासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस विभागामध्ये कार्यरत असलेल्या नोकरदारांना या योजनेचा फार मोठा लाभ होणार आहे. अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतल्या सर्वच पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करण्यात आलं आहे. येत्या काही काळात मुंबई पोलिसांना आपले हक्काचे घर मिळतील, अशी आशा आहे. मुंबईतील पोलिसांना घरे देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शहरातील सर्व पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी एक धोरण आखले जाईल. त्या माध्यमातून आगामी काळात पोलिसांच्या घराचा प्रश्न सुटेल.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेत, पुढच्या दोन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबई उपनगरांत राहून नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या पोलिसांना मुंबईमध्येच हक्काची घरे मिळणार आहेत. अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या पोलीस कर्मचारी पोलीस वसाहतींमध्ये राहत आहेत, त्यांना स्वत:च्या मालकीचे घरे हवे आहेत. त्याकरिता बैठक पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस विभागामध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणता येईल. ज्यांना मुंबईमध्ये घर घेणं शक्य झालेलं नाही, त्यांच्यासाठी एकप्रकारे दिलासा म्हणता येईल.
