'प्रीपेड टॅक्सी' आणि 'प्रीपेड ऑटोरिक्षा' सेवा सुरू झाल्यानंतर पारदर्शक भाडे दर आणि लूट थांबण्यास मदत होणार आहे. अनेकदा प्रवाशांची विमानतळाबाहेर रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. ड्रायव्हर आणि प्रवाश्यांमध्ये अनेक वेळा भाड्यावरून वाद होतात. भाडे ही वाढवून सांगितले जाते. हे टाळण्यासाठी प्रशासनाने नवीन आणि सुधारित भाडे दर सुद्धा जाहीर केले आहेत. हे दर अंतराप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. ते पूर्णपणे पारदर्शक असतील, असं ही सांगण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळावरून ही प्रीपेड टॅक्सी आणि ऑटोरिक्षा सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे टेन्शन मिटणार आहे.
advertisement
नव्या भाडेदरांनुसार प्रीपेड टॅक्सी सेवेसाठी सुधारित भाडेदर 20.66 रुपये प्रमाणे प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 6 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह एकूण 155 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 किलो मीटरसाठी 207 रुपये, 8.1 ते 10 किलोमीटरसाठी 258 रुपये, तर 10.1 ते 12 कि.मी. अंतरासाठी 310 रुपये इतके भाडे निश्चित केले आहे. तसेच 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 347 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 14.1 ते 16 किलोमीटरसाठी 397 रुपये, 16.1 ते 18 किलोमीटरसाठी 446 रुपये, 18.1 ते 20 किलोमीटरसाठी 496 रुपये, तर 22 ते 24 किलोमीटर अंतरासाठी 595 रुपये भाडे राहणार आहे.
नव्या भाडेदरांनुसार प्रीपेड ऑटोरिक्षा सेवेसाठी सुधारित भाडेदर 17.14 रुपये प्रमाणे प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आले आहे. 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह 129 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 कि.मी.साठी 171 रुपये भाडे राहणार आहे. 8.1 ते 10 कि.मी.साठी 214 रुपये रुपये भाडे राहणार आहे. तर 10.1 ते 12 किलोमीटरसाठी 257 रुपये भाडे राहणार आहे. 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 288 रुपये भाडे राहणार आहे. 24 ते 26 किलोमीटर अंतरासाठी 512 रुपये, तर 40.1 ते 42 किलोमीटर अंतरासाठी 828 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 42 किलोमीटरनंतरच्या प्रवासासाठीही दोन किलोमीटरच्या अंतराने पुढे भाडे निश्चित करण्यात आले आहे.
