TRENDING:

अदानींचे प्रकल्प कुठे कुठे? भारतासह महाराष्ट्र व्यापला, राज ठाकरेंनी दाखवलेला Video पाहून धक्का बसेल

Last Updated:

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कत भाजपवर जोरदार हल्ला केलाय. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेत राज ठाकरे यांनी ' लाव रे व्हिडीओ' म्हणत भाजप सरकार आणि उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधला. 2014 ते 2024 पर्यंत दहा वर्षात गौतम अदानी यांचे उद्योग कसे वाढत गेले याचे नकाशाच राज ठाकरेंनी दाखवला. वाढवण विमानतळाच्या माध्यमातून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. आधी पालघर आणि नंतर मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
News18
News18
advertisement

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कत भाजपवर जोरदार हल्ला केलाय. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपनं मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला असल्याची टीका त्यांनी केलीये. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

advertisement

अदानींवर राज ठाकरे काय म्हणाले? 

राज ठाकरे म्हणाले, मुंबई आणि राज्य देश विकायला काढला आहे. आपल्या समोर काय वाढून ठेवलय अंदाजही नाही. अदानी यांच्या उद्योगधंद्यांन अख्खा भारत व्यापला आहे. 2014 चा नकाशा बघा सरकारच्या आशीर्वादाने आता दहा वर्षात भारत अदानीमय झाला आहे. मी कोणाच्या व्यवसायाचया विरोधात नाही, मात्र एकाच माणसाच्या हातात सगळे दिले आहे. सिमेंट महाग केलं, वीज बंद केलं, तर आम्ही काहीच करू शकत नाही. 50 ते 60 शिवाजी पार्क बसतील एवढी मोठी जागा मुंबई विमानतळाला दिली आहे. मुंबई मिळत नसेल तर पैसे ओतून घ्यायची आहे. सत्ता डोक्यात गेलीय मुंबई गुजरातला न्यायची असेल तर पालघर, ठाणे ताब्यात घ्याव लागेल. मराठी माणसाला फोडा...

advertisement

अजित पवार आणि छगन भुजबळांविरोधात राज ठाकरे बरसले

भुजबळांना तुरुंगात डांबणारे फडणवीस आज त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसले? अजित  पवारांविरोधातील पुरावे आता का देत नाहीत? असा सवाल राज ठाकरेंनी केला. कबुतरखान्यासाठी आंदोलन करणाऱ्या जैन मुन्नींवर राज ठाकरेंनी टीका केली. मराठी माणसाला एकटं पाडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

advertisement

मराठी माणसासाठी, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचे आवाहन

मराठी माणसावर वेगवेगळ्या मार्गांनी हल्ले होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातून मराठी माणसाला बाहेर काढलं जात असल्याचा गंभीर आरोप. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनच्या मार्गावर उभारल्या जाणाऱ्या डोलेरा शहराचा संदर्भ दिला. शिवतीर्थावरील ठाकरेंची शिवसेना- मनसेच्या शिवशक्तीच्या महासभेत राजा ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन केलं. आज चुकलात तर संपलात म्हणून समजा. मराठी माणसासाठी, मुंबईसाठी एक व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

advertisement

 दुबार मतदारांना ठोकून काढण्याचे  राज ठाकरेंचे आदेश 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

शिवतीर्थावरील ठाकरेंची शिवसेना- मनसेच्या शिवशक्तीच्या महासभेत राजा ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन केलं. आज चुकलात तर संपलात म्हणून समजा. मराठी माणसासाठी, मुंबईसाठी एक व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचे आदेश दिले. सावध राहा सतर्क राहा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.

मराठी बातम्या/मुंबई/
अदानींचे प्रकल्प कुठे कुठे? भारतासह महाराष्ट्र व्यापला, राज ठाकरेंनी दाखवलेला Video पाहून धक्का बसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल