TRENDING:

गुड न्यूज! नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; एसी लोकल कधी धावणार?

Last Updated:

Mumbai Nashik AC Local Update : नाशिककरांनो लक्ष द्या आता दररोज मुंबईचा प्रवास करणं अत्यंत आरामदायी होणार आहे. नेमका कोणता प्रयगो नागरिकांसाठी राबवणार आहे जे जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई आणि नाशिक हे दोनही अत्यंत महत्त्वाची अशी शहरे आहेत. दररोज नाशिकहून मुंबईत अनेक लोक दररोज ये-जा करत असतात. मात्र यांना मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागते. पण आता हा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे.
Mumbai to Nashik AC local train latest update
Mumbai to Nashik AC local train latest update
advertisement

नाशिक-मुंबई प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार

आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई-नाशिक एसी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की ही एसी लोकल सेवा सुरू झाल्यास मुंबई ते नाशिक प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येईल.

कसाऱ्यापासून नाशिकपर्यंत लोकल वाढवण्याचे प्रयत्न

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

सध्या कसाऱ्यापर्यंत धावणारी लोकल नाशिकपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कसारा घाटातील तांत्रिक अडचणींमुळे साधी लोकल सेवा सुरू होऊ शकली नाही. मात्र एसी लोकलसाठी अडथळे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील प्रवास सोयीचा होईलच पण औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या/मुंबई/
गुड न्यूज! नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; एसी लोकल कधी धावणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल