रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने अलीकडेच असिस्टंट लोको पायलट पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. जाहीर केलेल्या नोकरभरतीमध्ये 11,190 रिक्त पदांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. या भरतीची संक्षिप्त अधिसूचना गेल्या काही दिवसांपूर्वीच आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. दरम्यान, असिस्टंट लोको पायलट पदासाठी संपूर्ण देशभरातून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. जरीही अलीकडेच भरतीची संक्षिप्त अधिसूचना जाहीर करण्यात आली असली तरीही अद्याप नोकर भरतीच्या प्रक्रियेसाठी बराच वेळ आहे. त्यामुळे ज्या तरूण- तरूणींना असिस्टंट लोको पायलट पदासाठी नोकरभरतीमध्ये अर्ज करायचा असेल, त्यांना मे 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
advertisement
15 मे 2026 पासून नोकरभरतीसाठी सुरूवात होणार असून शेवटची तारीख 14 जून 2026 आहे. असिस्टंट लोको पायलट पद लेव्हल 2 मध्ये येतं. या लेव्हल- 2 मधील पदांना दरमहा 19,900 रूपये इतका सुरुवातीला मूळ वेतन असून, त्यासोबत महागाई भत्ता (डीए) आणि घरभाडे भत्ता (एचआरए) यांसारखे भत्ते मिळतात, ज्यामुळे एकूण पगार खूप चांगला होतो. ही एक सरकारी नोकरी असून, यामध्ये पेन्शन, वैद्यकीय भत्त्यासह इतरत्र फायदेही तरूणांना मिळणार आहेत. देशातल्या वेगवेगळ्या प्रमुख शहरांमध्ये ही भरती केली जात आहे. नोकरभरतीच्या प्रक्रियेसाठी उमेदवारांना बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे. या पदासाठी शिक्षणाचीही अट आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराकडे 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/ मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ आणि टीव्ही मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर व्हेईकल मेकॅनिक, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिकसह इत्यादी ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI ची पदवी आवश्यक आहे. शिवाय, उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा. संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
अर्जाची फी किती असणार याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी असणार आहे. 1 जुलै 2026 या तारखेनुसार उमेदवाराचे वय मोजले जाणार आहे. SC, ST, OBC, EWS आणि महिलासह इतरत्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
