शंकर शेरखाने आणि त्यांचे बंधू गणेश शेरखाने हे दरवर्षी सजावटीचं बारकाईने नियोजन करतात. त्यांच्या या उपक्रमात घरातील सर्व सदस्य आपापला सहभाग नोंदवतात. त्यांची आई शांता शेरखाने, तसेच मुलं दृष्टी, अथर्व आणि धनंजय शेरखाने यांचा सजावटीमध्ये मोठा सहभाग असतो. शंकर शेरखाने यांची पत्नी अनिता शेरखाने आणि गणेश शेरखाने यांची पत्नी मीनाक्षी शेरखाने देखील घरकाम सांभाळून डेकोरेशनमध्ये मोलाचा हातभार लावतात.
advertisement
Gauri Ganpati: अवतरली, नवसाची गौराई माझी...! भांडूपच्या या कुटुंबातील गौरीची होतेय चर्चा, पाहा PHOTO
विशेष म्हणजे शेरखाने कुटुंबातील सर्व सदस्य हे नोकरी वा व्यवसायात गुंतलेले असूनही त्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून गेल्या दोन महिन्यांपासून हा देखावा तयार केला आहे. हे काम वेळेचं उत्तम नियोजन करत रात्री-अपरात्री मेहनत घेत पार पाडलं गेलं आहे.
या वर्षी उभारलेला तुळजापूरचा देखावा त्यांच्या भावनिक नात्यालाही स्पर्शून जातो. तुळजाभवानी ही शेरखाने कुटुंबाची कुलदेवता असून अनेक वर्षांपासून त्यांच्या मंदिराचा देखावा साकारण्याची कल्पना त्यांच्या मनात होती. यंदा त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवत एक अद्वितीय, श्रद्धायुक्त आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे.
शेरखाने कुटुंबाचा हा उपक्रम केवळ सौंदर्यदृष्ट्याच नव्हे, तर पर्यावरणपूरकतेचा आदर्श देखील ठरतो. त्यांच्या या प्रयत्नाला दरवर्षी विविध पुरस्कार व सन्मान मिळतात. यंदाचा तुळजापूर देखावा देखील विरारकरांसाठी आकर्षणाचं आणि प्रेरणेचं केंद्र बनला आहे.