TRENDING:

Mumbra : फुसके बार आले, पण यु-टर्न मारून रिटर्न जावं लागलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Last Updated:

शनिवारी मुंब्य्रातील मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. मात्र पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना रोखले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, 12 नोव्हेंबर : मुंब्रा इथं असणाऱ्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचं कार्यालय शिंदे गटाने जमीनदोस्त केलं. या कार्यालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. कार्यालय जमीनदोस्त केल्याने आता शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. शनिवारी या मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. मात्र पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना रोखले. केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र यांचे केस उपटेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी इशारा दिला.उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
News18
News18
advertisement

उद्धव ठाकरे यांनी स्टेजवरून भाषण करत म्हटलं होतं की, बॅरीकेटपलिकडे सर्व भाड्याने आणलेली तट्टू होती. मी लढण्यासाठी मैदानात आलोय. आमचे पोस्टर फाडले पण निवडणुकीत यांची मस्ती फाडल्याशिवाय राहणार नाही. बुलडोझरने शाखा पाडली. पण, खरा काय बुलढोझर असतो तो मुंब्र्याच्या रस्त्यावर पाहिला असेल. तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

advertisement

दरम्यान, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज फुसके बार मुंब्य्रात येऊन गेले ते वाजले नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. आणि त्यांना यु टर्न घेऊन रिटर्न जावं लागलं. आम्ही शिस्तीने तिथे होते. अर्धी मुंबई ते येताना सोबत घेऊन आले. दिवाळीत असं विघ्न आणणं योग्य नाही. काही लोकांना पोटदुखी झालीय. शिवसेनेची शाखा आम्ही पुन्हा बांधतोय. त्याचं कामही सुरु आहे. जुन्या शाखेत काही व्यवसाय चालायचे. शाखा हे न्यायाचं मंदिर असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbra : फुसके बार आले, पण यु-टर्न मारून रिटर्न जावं लागलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल