जेवणातील 'ही' जीवघेणी 'चूक'
मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेतील सकाळच्या वेळेत (तारीख.17) सोमवारी हा प्रकार घडलेला आहे. विषबाधा झालेले हे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवतील असल्याची माहिती मिळत आहे. त्या दिवशी हे विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाला त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. हा प्रकार पाहिल्यानंतर घाबरलेल्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले तर काही पालकांनी मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
advertisement
नेमका 'हा' प्रकार कसा आला उघडकीस
शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या म्हणण्यांनुसार, त्या दिवशी त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आला होता त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन कोणालाही समोसा न देण्यास सांगितले. मात्र ज्या वेळेस विद्यार्थ्यांना त्रास झाला तेव्हा समजले की,समोसा करताना कोणत्याही शिळ्या भाजीचा वापर झालेला नाही तर समोसा करताना जे तेल वापरले त्यामध्ये देव्हाऱ्यात ठेवलेला कापूर त्या तेलात पडला होता.
विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर...
सध्या पाच विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पालकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
