TRENDING:

Crime : मध्यरात्रीचा तो थरार! खिडकीच्या लोखंडी गजातून शिरला; पनवेलमध्ये केलं माणुसकीला काळिमा फासणारं कांड

Last Updated:

Panvel Crime : पनेवल शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आलेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पनवेल : पनवेल शहरात समोर आलेल्या या घटनेने प्रत्येक व्यक्ती घाबरला आहे. घराच्या बाथरुमची खिडकीवरील लोखंडी जाळी तोडून घरात आरोपीने प्रवेश केला आण जे नंतर केलं ते अतिशय थरकाप उडवणारे होते. नेमकी ही घटना कधी आणि कशी घडली याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
बाथरुमच्या लोखंडी जाळीतून आत प्रवेश करुन चोराचे धक्कादायक कांड
बाथरुमच्या लोखंडी जाळीतून आत प्रवेश करुन चोराचे धक्कादायक कांड
advertisement

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल शहरातील सेक्टर 12 भागातील एका बंगल्यात

सुरेंद्रकुमार सिंग हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. काही दिवसांआधी ते त्यांच्या गावी गेले होते. 16 मार्च रोजी परत घरी आले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याची समोर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडाना त्यांना लॅच तुटलेले दिसले शिवाय घरात प्रवेश केल्यानंतर सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

advertisement

धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी घराच्या बाथरुमच्या खिडकीची लोखंडी जाळीही तोजून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील सर्व कपाटे उघडून त्यांनी सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची चोरी केली शिवाय कपाटात असलेली काही रोख रक्कमही चोरून नेली. एकूण सुमारे 1 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

या घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Crime : मध्यरात्रीचा तो थरार! खिडकीच्या लोखंडी गजातून शिरला; पनवेलमध्ये केलं माणुसकीला काळिमा फासणारं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल