टेलरकडे गेलेल्या मुलीसोबत घडलं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी बुधवार, 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वाशी परिसरातील एका टेलरच्या दुकानात नवीन कपड्यांसाठी माप देण्यासाठी गेली होती. माप घेण्याच्या बहाण्याने 46 वर्षीय टेलरने तिच्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेल्या प्रकारानंतर मुलीने लगेच घरी जाऊन पालकांना माहिती दिली. या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ वाशी पोलीस ठाणे गाठून आरोपी टेलरविरोधात तक्रार दाखल केली.
advertisement
या तक्रारीच्या आधारावर वाशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित टेलरविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलेला आहे.
