TRENDING:

गाडी कुणाची, चावी काढ! गिरगावात व्हायरल गर्लचा स्वॅग नडला! बाईक रेस करणाऱ्या गौरीला पोलिसांचा दणका, VIDEO

Last Updated:

कावासाकी निन्जा H2 सारख्या हायपर स्पोर्ट्स बाईकचा कानठळ्या बसवणारा आवाज घुमला. या बाइकला रेस करत असताना महिला पोलिसांनी मात्र हटकलं आणि तिथे वाद झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुढीपाडव्यानिमित्ताने मुंबईत अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतात. त्यात गिरगावची शोभायात्रा म्हणजे शानच निराळी, ती पाहण्यासाठी लोक लांबून येतात. या शोभायात्रेला गालबोट लागता लागता राहिलं . मुंबईतील गिरगावची शोभायात्रा म्हटली की डोळ्यासमोर येतो तो पारंपारिक पेहराव, लेझीम पथकं आणि ढोल-ताशांचा गजरात निघणारी शिस्तबद्ध मिरवणूक.
News18
News18
advertisement

मात्र, याच मिरवणुकीत यंदा कावासाकी निन्जा H2 सारख्या हायपर स्पोर्ट्स बाईकचा कानठळ्या बसवणारा आवाज घुमला. या बाइकला रेस करत असताना महिला पोलिसांनी मात्र हटकलं आणि तिथे वाद झाला. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर गौरी मोरे आपल्या महागड्या बाईकला गर्दीत रेस' देत असतानाच एका महिला पोलीसाने तिला कडक शब्दांत सुनावलं.

बाइक रेस करताना पाहून पोलिसांचा संताप

advertisement

मिरवणुकीसाठी गिरगावच्या अरुंद गल्ल्यांमध्ये हजारो लोकांची गर्दी उसळलेली असते. अशा संवेदनशील ठिकाणी गौरी मोरे आपल्या स्पोर्ट्स बाईकचा एक्सलेटर जोरात फिरवून सायलेन्सरचा मोठा आवाज काढत होती.

हा गोंधळ पाहून तिथे तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी धावत आल्या. त्यांनी थेट गाडीसमोर उभं राहून, "काय चाललंय हे? आम्ही काय इथे वेडे आहोत का?" असा प्रश्न केला. इतक्या गर्दीत अशा प्रकारे बाईक रेस करणं लोकांच्या जिवावर बेतू शकतं, असं सांगत त्यांनी गौरीला आणि तिथल्या तरुणांना फैलावर घेतलं.

advertisement

नंबर प्लेट नाही स्थानिकांची नाराजी

केवळ गोंधळच नाही, तर गौरीच्या त्या महागड्या बाईकला 'नंबर प्लेट' नसल्याचा मुद्दाही पोलिसांनी उपस्थित केला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेताच तिथल्या काही स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला. यांची चावीच काढून घ्या, अशी मागणी लोक करू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तात्काळ गर्दी मागे हटवली आणि संबंधित बाईकस्वारांना तिथून बाजूला व्हायला भाग पाडलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

शोभायात्रेत रिल्स बनवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी अतरंगी कृत्य करताना दिसतात. मात्र, गिरगावसारख्या गर्दीच्या ठिकाणी नियमांची ऐशीतैशी करणं गौरी मोरेला चांगलंच महागात पडलं आहे. कायद्यापेक्षा 'स्वॅग' मोठा नाही, हेच या महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. या घटनेमुळे सोशल मीडियावर आता दोन गट पडले असून, काहींनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे, तर काही गौरीची बाजू घेत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
गाडी कुणाची, चावी काढ! गिरगावात व्हायरल गर्लचा स्वॅग नडला! बाईक रेस करणाऱ्या गौरीला पोलिसांचा दणका, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल