TRENDING:

ठाणेकर मोठे ड्रम, कळशा, घागरी भरून ठेवा, ऐन उन्हाळ्यात पाणी बंद राहणार, कधी आणि कुठं?

Last Updated:

Thane Water Supply: पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस पाणी कमी दाबाने येईल. त्यामुळे काटकसरीने वापर करावा लागेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीतून माजिवडा जंक्शन परिसरात मोठी पाणी गळती होत आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रविवारी, 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद राहील. पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
ठाणेकर मोठे ड्रम, कळशा, घागरी भरून ठेवा, ऐन उन्हाळ्यात पाणी बंद राहणार, कधी आणि कुठं?
ठाणेकर मोठे ड्रम, कळशा, घागरी भरून ठेवा, ऐन उन्हाळ्यात पाणी बंद राहणार, कधी आणि कुठं?
advertisement

या भागात पुरवठा बंद

या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

advertisement

तसेच राबोडी 1 व 2, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. 3 परिसर, काकडे चाळ या भागात देखील 24 तास पाणी येणार नाही.

advertisement

माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगर परिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. 1, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. 2 आदी भागांचा पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येईल. त्यामुळे या काळात पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

advertisement

माजिवडा जंक्शन सेवा रस्ता बंद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

सदर कामाकरिता गोल्डन डाईज माजिवडा जंक्शन  येथील सेवा रस्ता बंद ठेवावा लागणार आहे. परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
ठाणेकर मोठे ड्रम, कळशा, घागरी भरून ठेवा, ऐन उन्हाळ्यात पाणी बंद राहणार, कधी आणि कुठं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल