मुंबई : दररोजच्या रेल्वे प्रवासात आपण अनेक लहान मुले-मुली वेगवेगळ्या वस्तू विकताना किंवा पैसे मागताना पाहतो. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे याच विद्यार्थांना एकत्र आणून त्यांना शिक्षण देण्याचा निर्णय मुंबईच्या हेमांती सेन हिने घेतला. यासाठी त्यांनी 2018 मध्ये जुनून या संस्थेची स्थापना झाली.
संस्थेच्या स्थापनेनंतर तिने वेगवेगळ्या मुलांना शोधले. मुलांच्या कलेतील आणि शिक्षणाच्या आवडी निवडी जाणून घेतल्या. जास्तीत जास्त विद्यार्थांना शिक्षण मिळावे, हा मुख्य उद्देश लक्षात ठेवून जुनून संस्था काम करते. आतापर्यंत 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शोधून त्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम केले. सध्या या संस्थेंतर्गत 80 विद्यार्थी शाळेत जातात.
advertisement
अनेकदा मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यासाठी नकार देतात, अशावेळी हेमांती आणि तिची टीम पालकांची समजुत काढून त्यांना शाळेत पाठवण्याचे काम करते. ही संस्था फक्त शिक्षणापूर्ती मर्यादित्य न राहता खेळ आणि कलागुणांना देखील वाव देते. जुनून या संस्थेमुळे मुंबईतील अनेक विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण होत आहे.
मुलांनो गणपतीत घालण्यासाठी सुंदर कुर्ती हवेत?, घाटकोपरमधील हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन, VIDEO
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत या गरजांसोबतच शिक्षणही एक मूलभूत गरज बनली आहे. याच गरजेला लक्षात ठेवून हेमांतीने मुंबईच्या रेल्वेपराचा परिसरातील 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार उघड करून दिले. एवढेच नव्हे तर ती विद्यार्थ्यांसोबत नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांना शिक्षणात रस यावा यासाठी वेगवेगळे खेळ, चित्रकला आणि स्पर्धाही आयोजित केल्या जातात. हेमांती सेन हिचा हा उपक्रम खरंच खूप विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करत आहे.