मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर टोल माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी ही टोलमाफी असणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामध्ये मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर आज रात्री 12 वाजेपासून टोल माफी करण्यात आली आहे. मात्र, ही टोल माफी सर्व गाड्यांसाठी नसून फक्त खासगी गाड्यांसाठी म्हणजेच व्हाईट नंबर प्लेट गाड्यांसाठी आहे. त्यामुळे व्यावसायिक किंवा टुरिस्ट प्रकारात मोडणाऱ्या गाड्यांना टोल भरावा लागणार आहे. दरम्यान, आता नागरिकांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या, ते जाणून घेऊयात.
advertisement
sangli farmer : 3 एकरात 53 टनचे विक्रमी उत्पादन, पपईच्या शेतीतून कमावलं 14 लाखांचं उत्पन्न
मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना सध्या 45 ते 75 रुपये एवढा टोल आकारला जातो. मुंबईत दहिसर, आनंदनगर, ऐरोली, मुलुंड आणि वाशी हे एकूण 5 टोल नाके आहेत. बऱ्याचदा मार्गांच्या आणि उड्डाण पुलांच्या डागडुजीसाठी टोल आकारले जातात. पण आता टोल माफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
लोकल18 च्या टीमने आनंद नगरच्या टोल नाक्यावरून काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. या प्रवाशांनी म्हटले की, खरे तर हा एक उत्तम निर्णय आहे. सर्वांसाठीच आहे. असे अनेक निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतले पाहिजे आणि त्याच्यावर सतत विचार केला पाहिजे.
दुसरे प्रवाशी म्हटले की, प्रवाशी म्हणाले की, इथं टोलमुळे ट्राफिक भरपूर व्हायची. आता ट्राफिक कमी झाली. स्थानिकांना प्रत्येक वेळी टोल द्यावा लागायचा. तो टोल बंद झाला. हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे. तसेच मुंबईला ज्या गाड्या जातात त्या फ्री करायला पाहिजे. कारण मुंबईला जेवढी ट्रॅफिक आहे, त्यामुळे बाहेरच्या कंपन्या येत नाहीत. त्यासाठी काही तरी करायला पाहिजे. टोल केल्यामुळे बाहेरच्या गाड्या येतील आणि इन्कम वाढायला मदत होईल, अशी प्रतिक्रियाही प्रवाशांनी दिली.