TRENDING:

महामार्गांवर प्रवाशांचा 'वनवास'! मुंबई-पुणे असो वा कोल्हापूर मोठी वाहतूक कोंडी; रस्ते कधी मोकळे होणार?

Last Updated:

Traffic Jam News : प्रवाशांनो लक्ष द्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या महामार्गावर वाहतूक कोंडीने अक्षरशा नागरिग हैराण झालेला आहेत. नेमकी ही वाहतूक कोंडी कोणत्या मार्गावर झालेली आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मुंबई-पुणे महामार्गावरील एका अपघाताने वाहतूकोंडी झाली होती. याचा मोठा फटका आणि त्रास दोन दिवस वाहनचालकांना झाले होता. मात्र तो त्रास संपत नाही तो पर्यत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही महामार्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. नेमके ते कोणते मार्ग आहेत त्याबाबत सविस्तर अपडेट पाहूयात.
News18
News18
advertisement

पुणे-मुंबई महामार्ग सुरू झाला, पण दिलासा नाही

पुणे-मुंबई महामार्गावरील तब्बल 33 तासांनंतर वाहतूक सुरू झाली असली तरी वाहनचालकांचा त्रास काही कमी झालेला नाही. ज्याच दोन दिवस महामार्ग बंद राहिला असून त्यात वाहतूक कोंडीही झाली होती.

कांदा ट्रक अपघातामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्प

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोलनाका परिसरात मोठी कोंडी झाली आहे. पुण्याहून कांद्याने भरलेला ट्रक हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील ओढ्यावरील पुलाजवळ पलटी झाला. आज सकाळी घडलेल्या या अपघातामुळे ट्रकमधील कांदा संपूर्ण रस्त्यावर विखुरला गेला.

advertisement

परिणामी पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. किनी टोलनाक्यापासून कराडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

पुन्हा एकदा एक कंटेनर बंद पडला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांची अडचण अद्याप संपलेली नाही. आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरच्या भीषण अपघातामुळे तब्बल 28 तास महामार्गावर वाहतूक ठप्प होती. मात्र वाहतूक हळूहळू सुरळीत होत असतानाच घाटात सिमेंटने भरलेला एक अवजड कंटेनर बंद पडला. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
महामार्गांवर प्रवाशांचा 'वनवास'! मुंबई-पुणे असो वा कोल्हापूर मोठी वाहतूक कोंडी; रस्ते कधी मोकळे होणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल