स्वता:च्या चिमुकलीवर वडिलांचा भयंकर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण मुंबईतील आहे. जिथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील महिलेचा मुलीच्या जन्मानंतर किडनीच्या आजारामुळे निधन झाले.त्यामुळे चिमुकलीचा सांभाळ तिच्या आज्जीने सुरु ठेवला आणि घरात चिमुकली,वडील आणि वृद्द महिला राहत आहे. मात्र पत्नीच्या निधनानंतर आरोपी व्यक्ती राहुल शेटे(वय35)हा एक वर्षाच्या चिमुकलीला आणि स्वत:च्या आईला त्रास देण्यास सुरुवात केली.
advertisement
अनेक दिवस लोटले मात्र 7 डिसेंबर रोजी चिमुकलीला भुक लागली असल्याने तिची आजी तिला दूध आणि बिस्कीट भरवत होती. दरम्यान आरोपी राहूल तिथं आला आणि जोरजोरात स्वत:च्या आईवर जोरजोरात ओरडू लागला आणि शिवीगाळ करत बसला. राहूलच्या आवाजाने चिमुकली घाबरुन रडू लागला. मात्र रागात असलेल्या राहूलने कोणताही विचार न करता चिमुकलीला मारहाण करु लागला आणि मारण्याची धमकीही दिली
सर्व प्रकार पाहताच शेजारच्यांनी परिस्थिती थोडी शांत केली मात्र आरोपीचा राग काही कमी झाला नाही. मुलाचे हे भयंकर रुप पाहून चिमुकलीच्या आजीने मानखुर्द पोलिसात धाव घेत राहुलविरोद्धात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तातडीने राहूनवर गुन्हा दाखल केला आहे.
आईच्या निधनानंतर चिमुकलीसाठी तिची आजी एकमेवच आधार आहे. तातडीने सामाजिक आणि कायदेशीर मदत मिळावी अशी तिच्या आजीची प्रार्थना आहे.
