TRENDING:

मस्ती नडली! मुंबईत धावत्या ट्रेनमधून 2 मद्यधुंद तरुण पडले, खार स्थानकादरम्यानची घटना

Last Updated:

नशेत असल्यामुळे हात सटकला आणि चालत्या गाडीतून ते थेट बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सुरक्षित प्रवासासाठी वारंवार आवाहन केले जात असतानाही, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबलेले नाही. पश्चिम रेल्वेवरील खार रोड रेल्वे स्थानकाजवळ आज दोन तरुण धावत्या लोकलधून रुळावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही इसम दारूच्या नशेत होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर ही घटना घडली. दोन इसम लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करत होते. मात्र, गाडीने वेग घेतल्यानंतर खार स्टेशनच्या काही अंतरापूर्वीच हे दोघेही एकामागून एक रेल्वे रुळावर पडले. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच तातडीने मदतकार्य हालचाली सुरू झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोघेही नशेमध्ये धुंद होते आणि दरवाजाला धरून लटकत असताना त्यांचा तोल गेला.

advertisement

दारूची नशा ठरली जीवघेणी

अपघातानंतर रेल्वे पोलीस आणि जीआरपीचे (GRP) पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही जखमींनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते. नशेत असल्यामुळे हात सटकला आणि चालत्या गाडीतून ते थेट बाहेर पडले. या अपघातात दोघांनाही डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

advertisement

तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही

घटनेची माहिती मिळताच  वांद्रे रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना रेल्वे रुळावरून सुरक्षित बाहेर काढून नजीकच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इसमांची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलीस त्यांच्याजवळील सामानावरून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

प्रवाशांना इशारा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
असं गाव जिथे फोडली जाते एकमेकांडी डोकी, रक्त निघालं तर मानता देवीचा प्रसाद!
सर्व पहा

रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रवाशांना कडक इशारा दिला आहे. नशेत प्रवास करणे किंवा दरवाजावर लटकणे हे केवळ कायद्याने गुन्हा नसून ते जीवघेणे ठरू शकते, असे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. खार स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. .

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मस्ती नडली! मुंबईत धावत्या ट्रेनमधून 2 मद्यधुंद तरुण पडले, खार स्थानकादरम्यानची घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल