सुरुवातीला दोघांनी मिळून जुहू येथे एक छोटासा फूड स्टॉल सुरू केला. पण काही कारणांमुळे तो स्टॉल बंद पडला. पहिला प्रयत्न अपयशी झाला तरी दोघांनी हार मानली नाही. “आपण व्यवसाय करायचाच ठरवलंय, तर मागे पाहायचं नाही.” असं ठरवून त्यांनी पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करताना दोघांनी थोडी सेव्हिंग जमा केली होती. तीच सेव्हिंग एकत्र करून जवळपास पाच लाख रुपये भांडवल तयार केलं. या पैशातून त्यांनी अंधेरीमध्ये स्वतःचं छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं.
advertisement
या रेस्टॉरंटचं नाव त्यांनी ‘दोस्ती किचन’ ठेवलं. कारण हा व्यवसाय दोघांच्या मैत्रीवर, विश्वासावर आणि अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीवर उभा राहिला. म्हणूनच दोघांनी मिळून हे नाव ठेवलं. आज ‘दोस्ती किचन’मध्ये चायनीज पदार्थ, बिर्याणी आणि त्यांच्या खास डिशेस खूप लोकप्रिय आहेत. अंधेरीतील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे लोक मोठ्या प्रमाणात इथे खायला येतात. चार वर्षांत या रेस्टॉरंटची महिन्याची कमाई सात लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे. अंधेरी पूर्व इथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन आणि गुंदवली मेट्रो स्टेशनपासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर दोस्ती किचन हे या दोघांचे रेस्टॉरंट आहे.