नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिले. उद्धव ठाकरे यांच्या अनेक उमेदवारांना मुस्लिम समाजाच्या मतांचा मोठा फायदा झाला. त्यामुळे शिवसेनेत फूट पडलेली असतानाही ठाकरेंनी ९ जागांवर विजय मिळवला. मुस्लिम समाजाच्या 'मशाली'वरील विश्वासाची नोंद घेऊन त्यांनाही प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
दिलीप मोहिते पाटलांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्री करतो, अजितदादांची जाहीर सभेत घोषणा
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते घेण्याचा प्रयत्न
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे १८० अंशात बदलली आहेत. अनेक मतदारसंघातील उमेदवारांची पक्षांतरे, त्यामुळे उमेदवारांची निर्माण झालेली कमतरता असे प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर आहेत. त्याचमुळे विधानसभेला अजून दीड महिन्यांचा अवधी असताना राजकीय पक्षांची जागा वाटपासंबंधीची चर्चा आणि उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देऊन समाजाची एकगठ्ठा मते घेता येईल पर्यायाने आमदारांची संख्या वाढायला देखील मदत होईल, असे ठाकरेंचे नियोजन आहे.
शिवसेनेत 'मेरिट'वर उमेदवारी
याचसंबंधी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, शिवसेना कधीही जातपात धर्म वगैरे बघून उमेदवारी देत नाही. ज्याचे कर्तृत्व आहे, त्याला मेरिटनुसार शिवसेना पक्ष उमेदवारी देतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. येत्या विधानसभेलाही मेरिटमध्ये मुस्लिम बसले तर त्यांना उमेदवारी देऊ, असे ते म्हणाले.
मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा ठाकरेंचा विचार
मुस्लिम मते हवीत मग प्रतिनिधित्व का देत नाही? अशी विचारणा एमआयएमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील सातत्याने उद्धव ठाकरे यांना करायचे. तसेच समाजातील प्रमुख मान्यवर मंडळीही याच मुद्द्यावरून शिवसेनेला छेडायचे. यंदाच्या विधानसभेला दोन चार मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देऊन समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा विचार शिवसेना करीत आहे. जेणेकरून विरोधकांच्या टीकेची धार कमी होईल.