दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म ?
- या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्मची उभारणी.
- सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची मर्यादा विरार आणि डहाणूपर्यंत असली तरी त्यापुढे वापी, वलसाड, नवसारी आणि सुरतपर्यंत मोठ्या प्रमाणावर दैनंदिन प्रवासी प्रवास करत आहेत.
- सुरतचा डायमंड उद्योग, टेक्सटाईल मार्केट, वापी- वलसाड औद्योगिक पट्टा तसेच मुंबईतील सेवा क्षेत्र यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे.
advertisement
विरार-सुरत नमो भारत आणि वंदे मेट्रो
- सध्या या मार्गावर मेमू आणि डेमू प्रकारातील काही गाड्या धावत असल्या तरी पूर्ण विकसित सबर्बन नेटवर्कसारखी वारंवार सेवा उपलब्ध नाही.
- याच पार्श्वभूमीवर सुरत स्टेशनवर उभारले जाणारे स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म हे भविष्यातील रेल्वेचे नियोजनात 200 ते 300 किमी अंतरासाठी नमो भारत आणि वंदे मेट्रोसारख्या जलद शहरी रेल्वे सेवांवर भर दिला जात आहे.
- त्यानुसार विरार ते सुरत दरम्यान अशा आधुनिक सबर्बन सेवा सुरू होण्याची योजना आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 4:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Local: वंदे भारतनंतर आता वंदे लोकल धावणार, कोणत्या मार्गावरील प्रवाशांना मिळणार रेल्वेचं गिफ्ट
