खरं तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडी त्यासोबत मनसेची आघाडी करण्याची चर्चा सूरू होती.त्यात वसई विरारमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा एकही आमदार निवडुन आला नव्हता. त्यामुळे बविआची ताकद कमी झाली होती आणि भाजप पक्ष शहरात वाढताना दिसत होता. हे पाहता हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसोबत मिळून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव होता. पण आता वसई विरारमध्ये बविआ आणि मनसेची युती झाली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीत बविआ आणि मनसे एकत्रितपणे लढताना दिसणार आहे.
advertisement
मनसेच्या या ठिकाणी एकही जागा नाहीत.त्यामुळे पक्ष वाढीसाठी बहुजन विकास आघाडीने बविआसोबत युती करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.खरं तर या युतीच्या चर्चा होत असताना, एकत्रितपणे लढायचे असेल आणि भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला हटवायचे असेल, तर आमच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी अट हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवण्यात आली होती. ही अट कदाचित ठाकरे गटाला मान्य नसल्याने त्यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तसेच मागच्या वर्षी शिवसेनेच्या 5 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे जर आपल्या जागा निवडून येत असताना दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर का लढावं?यामुळे ठाकरे गटाने युतीस नकार दिल्याचे समजते.विशेष म्हणजे चिन्हाच्या या अटीबाबत येत्या 2 दिवसात मनसे निर्णय घेणार असल्याचेही बोलले जात आहे.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला
खरं तर गुरूवारी नालासोपारा येथील भाजपा कार्यालयात झालेल्या तीन तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर या जागावाटपावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार भाजप 91 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आणखी 3 ते 4 जागांच्या वाटपाबाबत बोलणी सूरू आहे. त्यावरच लवकर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
वसई विरार महापालिकेचा 2015 चा पक्षनिहाय निकाल
बहुजन विकास आघाडी : 106
भाजपा : 1
काँग्रेस : 0
राष्ट्रवादी काँग्रेस : 0
शिवसेना : 5
इतर/अपक्ष : 3
एकूण 116 जागा
