TRENDING:

Mumbai : अरबोरिकल्चर परिषदेच्या विचार मंथनातून शाश्वत आणि हरित मुंबई घडवू : महापौर रितू तावडे

Last Updated:

'ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित 'दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद, वृक्षवर्धन 2026' आज मुंबईत बीएमसीच्या महापौर रितू तावडे यांनी उद्घाटन सत्रास उपस्थिती दर्शवली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 'ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित 'दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद, वृक्षवर्धन २०२६' आज मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत मुंबई महापौर रितू तावडे यांनी उद्घाटन सत्रास उपस्थिती दर्शवली.
News18
News18
advertisement

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक आणि ATCA संघटनेचा आजवरचा प्रवास यावर सुरुवातीला संचालक वैभव राजे यांनी भूमिका मांडली. संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे CEO आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर तावडे म्हणाल्या,"बोरिकल्चर परिषदेच्या माध्यमातून मला हे स्पष्ट झाले की, माणसाच्या हेल्थ रिपोर्ट प्रमाणे झाडाचाही हेल्थ रिपोर्ट तयार होऊ शकतो. उंच इमारतींचा विकास म्हणजे फक्त विकास नाहीतर या विकासासोबत आपल्याला हिरवे अच्छादन आवश्यक आहे. मुंबई ही फक्त देशाची आर्थिक आणि राज्याची राजकीय राजधानी नाही तर हे मानव आणि निसर्गाच्या सहजीवनाचे शहर आहे."

advertisement

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर भाष्य करताना महापौर तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, "शहरांमधील हरित आच्छादन वाढवणे ही जबाबदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांची देखील आहे. हरित आणि निरोगी मुंबई करण्यासाठी मुंबईची प्रथम नागरिक म्हणून मी कटिबद्ध आहे. अरबोरीकल्चर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांच्या आभार व्यक्त करताना या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तज्ञांनी विचार मंथन केले. निश्चितपणे विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या मुंबईला या परिषदेच्या मंथनातून नवे विचार आणि मार्ग पुढे येतील. परिषदेचे या सगळ्या शिफारसी आम्ही निश्चितपणे हरित आणि शाश्वत सुगंधित मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंमलात आणू."

advertisement

उद्घाटनापुर्वी 'सिटीज, गव्हर्नन्स अँड ट्रीज' या विषयावर महत्त्वपूर्ण फायरसाइड चॅट आयोजित करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या सहाय्यक संपादक रिचा पिंटो यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शहरी वृक्षसंवर्धन, प्रशासन आणि शाश्वत नगर नियोजन या विषयांवर मौलिक विचार मांडले. शहरांच्या विकासात वृक्षांना केंद्रस्थानी ठेवणे ही काळाची गरज असल्याचे या चर्चासत्रातून अधोरेखित झाले.

advertisement

भूषण गगराणी म्हणाले,' वाढत्या नागरिकांना बरोबर विकास हा आव्हानात्मक गोष्ट आहे. सरकारी आणि खाजगी प्रकल्पातून विकासकामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे सध्या शुद्ध समकक्ष परिस्थिती आमच्या पुढे निर्माण झाली आहे. रस्ते मेट्रो पूल सांडपाण्याची व्यवस्था मेट्रो भूमिगत असावी की एलेवेटेड असावी यावर मतभेद असू शकतात परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि धोरणे देखील महत्त्वाचे असतात. विकासाबरोबर हरित अच्छादन टिकवून मान्सून मधील झाडे कोसळण्याचे संकटे रोखण्यासाठी प्रशिक्षित अनुभवी अर्बोकल्चरीकल्चरीस्ट कडून आणि मदत घेण्यात कुठेही कमी पडणार नाही. अतितीव्र वातावरण बदल आणि हरीत विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असेल,असे भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.

advertisement

पहिल्या दिवसाचे मुख्य वक्ते म्हणून आर्किटेक्ट, बॉम्बे ग्रीनवे व लव्ह युअर पार्क्स (LYP) मुंबईचे सहसंस्थापक अलन अब्राहम यांनी 'शहरी सार्वजनिक जागा, हरित पायाभूत सुविधा आणि नागरिक सहभाग' या विषयावर प्रेरणादायी भाषण केले. हवामान संकटाला तोंड देण्यासाठी वास्तुशास्त्र आणि नागरी सहभाग यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी प्रभावीपणे विशद केले. मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या समरस त्यांनी शहराच्या शाश्वत विकासाचे एक मॉडेल तुलनात्मक सादरीकरणातून दाखवून दिले.

अरबोरीकल्चर परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये वास्तुविशारद आणि बॉम्बे ग्रीनवे / LYP मुंबईचे सहसंस्थापक अलन अब्राहम यांनी 'शहरी वृक्षछत्र दृष्टीकोन' (Framing Urban Canopy Vision) या विषयावर प्रेरणादायी बीजभाषण केले. त्यानंतर Arbor Day Foundation चे सोफी प्लिट यांनी जागतिक अर्बन फॉरेस्ट्री चळवळीतील तातडीच्या गरजांवर प्रकाश टाकला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण यांनी हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या वृक्षप्रजातींच्या निवडीवर आधारित 'Climate-Resilient Species Selection' हा विषय मांडला. FAO चे Forestry Officer इंद्रजित मिस्त्री यांनी 'झाडांपासून परिवर्तनाकडे : Green Cities Framework' या संकल्पनेवर सखोल विवेचन केले.

दुसऱ्या सत्रामध्ये श्रुम सभा (ShroomSabha )चे सह-संस्थापक व्योम भट्ट यांनी शहरी वृक्षांमधील कुज (Wood Decaying Fungi)या विषयावर माहिती दिली. University of Göttingen, जर्मनीचे Prof. Steffan Rust यांनी Tree Safety Factor या नव्या संकल्पनेद्वारे वृक्षांच्या जोखीम व्यवस्थापनातील अनिश्चितता कमी करण्याचे मार्ग सांगितले. greehill चे CEO गॅबर गोर्ट्झ यांनी शहरी वृक्षांना पायाभूत सुविधा म्हणून कसे व्यवस्थापित करावे यावर भाष्य केले. Terra Nostra चे Tree Ambassador हेन्री कुपेन यांनी वृक्षारोपणानंतर झाडे रुजवण्याच्या प्रक्रियेवर (Tree Establishment) व्यावहारिक मार्गदर्शन केले. Arboriculture Australia च्या बोर्डाचे संचालक कार्ल डाला रिवा यांनी ऑस्ट्रेलियातील शहरी वृक्ष व्यवस्थापनाच्या किमान उद्योग मानकांवर (Minimum Industry Standards) आधारित सादरीकरण केले.

उद्या ८ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी २:०० वाजता परिषदेस उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छा दूत व प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य वक्त्या असणार आहेत. जागतिक तज्ञांच्या सत्रांसह शहरी वृक्षसंवर्धन, अरबोरिकल्चर पद्धती आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

  1. ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद — वृक्षवर्धन २०२६ — आज मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत मुंबई महापौर रितू तावडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाली. यावेळी (उजवीकडून)
  2. नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे,CEO आर्यन पांडे, ATCA संचालक वैभव राजे आणि नकुल सावनी उपस्थित होते.

  3. दुस-या आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद — वृक्षवर्धन २०२६ — अनुषंगाने आयोजित प्रदर्शनाची पाहणी करताना मुंबईच्या प्रथम नागरिकांनी महापौर रितू तावडे.
  4. अरबोरिकल्चर परिषदेच्या उद्घाटनापूर्वी 'सिटीज, गव्हर्नन्स अँड ट्रीज' या विषयावर आयोजित महत्त्वपूर्ण फायरसाइड चॅट मध्ये सहभागी टाइम्स ऑफ इंडियाच्या सहाय्यक संपादक रिचा पिंटो,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे,CEO आर्यन पांडे, ATCA संचालक वैभव राजे उपस्थित होते.
  5. ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित 'दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद, वृक्षवर्धन २०२६' आज मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे सुरू असलेल्या परिषदेमध्ये सहभागी धोरण करते नियोजनकार,आर्किटेक्ट नागरिक आणि वृक्षप्रेमी...
  6. आंतरराष्ट्रीय दुसऱ्या अरबोरीकल्चर परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि लव यू पार्कचे सहसंस्थापक ॲलन अब्राहम उपस्थित होते
  7. टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
    सर्व पहा

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : अरबोरिकल्चर परिषदेच्या विचार मंथनातून शाश्वत आणि हरित मुंबई घडवू : महापौर रितू तावडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल