TRENDING:

Western Railway : लाईट, साउंड, कॅमेरा...अ‍ॅक्शनमुळं रेल्वेची होतेय कमाई, पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत वर्षभरात कोटींची भर

Last Updated:

Western Railway : पश्चिम रेल्वेने चित्रपट आणि जाहिरात चित्रीकरणातून 1.72 कोटींचे उत्पन्न मिळवले. मागील वर्षाच्या तुलनेत 25 टक्के वाढ झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकर तुम्ही दररोज ज्या लोकलमधून किंवा अनेकदा ज्या एक्सप्रेसमधून कधीनाकधी प्रवास केला असेल पण आता याच सर्व गोष्टींचा वापर करुन रेल्वेने एका वेगळ्या माध्यामातून कोट्यांवधींचा महसूल कमावला आहे. नेमका हा महसू कसा कमावला याबाबत अनेकांना प्रश्न चिन्ह पडलेली आहे.
Western Railway film shooting revenue 2026
Western Railway film shooting revenue 2026
advertisement

पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात चित्रपटांचा मोठा वाटा

पश्चिम रेल्वेमधील विविध स्थानके, गाड्या आणि रेल्वे परिसर चित्रपट, टेलिव्हिजन मालिका, वेब सिरीज आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मेल-एक्सप्रेस गाड्या तसेच उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना वास्तववादी ठिकाणे उपलब्ध होतात.

चित्रपटाच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला 1.72 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल.प्रवासी आणि मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच आणखी उत्पन्न वाढीसाठी पश्चिम रेल्वे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग असलेल्या पश्चिम रेल्वेने 2025-26 या वर्षात चित्रपट चित्रीकरणातून उत्पन्न मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत चित्रपट चित्रीकरणातून अंदाजे 1.72 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

advertisement

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात अंदाजे 25 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये पश्चिम रेल्वेने चित्रपट चित्रीकरणातून अंदाजे 1.64 कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेने पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोकेशन्सला निर्मात्यांची पहिली पसंती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

पश्चिम रेल्वेच्या विविध ठिकाणी चित्रित झालेल्या चित्रपटांमध्ये ओ रोमियो, फतेह, तेरा यार हूं मैं, सिकंदर आणि लिझोल, पेटीएम, कोलगेट इत्यादी अनेक जाहिरातींचा समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway : लाईट, साउंड, कॅमेरा...अ‍ॅक्शनमुळं रेल्वेची होतेय कमाई, पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत वर्षभरात कोटींची भर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल