कसे आहेत सुधारित दर?
पश्चिम रेल्वेने खाद्यपदार्थाचे दर प्रमाणित करण्यासाठी समिती नेमली होती. बाजाराचा अभ्यास करून समितीने खाद्यपदार्थांचे दर निश्चित केले. त्यामुळे कोरोना आणि इतर कारणांमुळे गेली अनेक वर्षे न बदललेले दर आता बदलण्यात आले आहेत. आता स्थानकांवरील स्टॉलवर 10 रुपयांना मिळणार वडा 15 रुपयांना मिळणार आहे. लिंबूपाणी, कोकम, रसना आणि सरबत 200 मिली ऐवजी 150 मिली इतकेच मिळणार आहे.
advertisement
Western Railway: गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून या मार्गावर विशेष रेल्वे!
नवीन खाद्यपदार्थ मिळणार
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता नवीन खाद्यपदार्थ मिळणार आहेत. यामध्ये दाबेली, व्हेज हॉट डॉग, चीज पनीर रोल, चीज पनीर हॉट डॉग, शेव पुरी, सँडविच, चायनीज भेळ आणि डोनट यांचा समावेश आहे. तर, आरोग्यदायक खाद्य पदार्थांमध्ये ज्वारीपासून बनवलेली चकली, पोहे, बिस्कीट, खाकरा, थेपला यांचा समावेश असणार आहे.
निर्णयावर आक्षेप
पश्चिम रेल्वेने काही पेयांच्या किमती एक रुपयाने कमी केल्या आहेत. तसेच, त्यांचे प्रमाणही जास्त प्रमाणात कमी केले आहे. दुसरीकडे ब्रँडेड कंपन्यांमुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेले मिल्क शेक, चणे, शेंगदाणे, फरसाण यासारख्या स्वस्त आणि स्थानिक वस्तू बंद करण्यात आल्या आहेत. या निर्णयावर पश्चिम रेल्वे केटरिंग असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खाद्यपदार्थांची दरवाढ
रेल्वे स्थानकांवर चणे-शेंगदाणे, फरसाण, गुलाब / व्हॅनिला आणि चिकू मिल्कशेक, खारे शेंगदाणे आणि आईस्क्रीम डोनट यादीतून वगळण्यात आले आहेत. तर वडा, सामोसा, ढोकळा, साबुदाणा वडा, लाडू, सँडिव्हीज, उसळ, रगडा, फ्रँकी, पॅटिस इ. पदार्थांच्या दरांत वाढ केली आहे. प्रवाशांना स्थानकांवर दर्जेदार अन्न पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत असून नियमानुसार काही पदार्थांचे दर वाढविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
