Western Railway: गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून या मार्गावर विशेष रेल्वे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Western Railway: गणेशोत्सव आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते भुसावळ गाडी आता सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार आहे.
मुंबई: गणेशोत्सव आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासासाठी मुंबई-भुसावळ दरम्यान गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दादर – भुसावळ विशेष रेल्वेगाडीच्या सेवा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
असं असेल वेळापत्रक
गाडी क्रमांक 09051 ही दादर-भुसावळ त्रै-साप्ताहिक विशेष गाडी 30 जूनपर्यंत मर्यादित होती. आता या गाडीचे वेळापत्रक 3 जुलैपासून 29 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहे. ही गाडी आता दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दादरहून भुसावळकडे धावणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 09052, भुसावळ-दादर त्रै-साप्ताहिक विशेष गाडी सुद्धा याच कालावधीत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी भुसावळहून दादरकडे धावेल. या दोन्ही विशेष गाड्यांची प्रत्येकी 39 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, एकूण 78 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. त्यातच पावसाळ्यात नियमित गाड्यांवर ताण येतो. त्यामुळे या अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेत होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 12:33 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway: गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतून या मार्गावर विशेष रेल्वे!