विरार ते चर्चगेट प्रवास होणार सुलभ
विरार ते चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या लोकलची सेवा हळूहळू सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विरार ते वांद्रेपर्यंत 15 डब्यांची लोकल धावेल आणि नंतर ही सेवा चर्चगेटपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात ही लोकल उपलब्ध असल्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
सध्या पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरारदरम्यान 15 डब्यांच्या लोकल धावतात पण चर्चगेट ते अंधेरीदरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा विस्तार होत नाही आता या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरु केले गेले आहे.
वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म लांबवणे, ओव्हरहेड वायर सुधारणा आणि इतर यांत्रिक सुधारणा सुरू आहेत. या कामाचे पूर्ण होण्याचे नियोजन साधारण मे-जून पर्यंत ठेवण्यात आले आहे.
या कामांनंतर वांद्रे ते अंधेरीदरम्यान 15 डब्यांच्या लोकल्स सुरु होतील. परिणामी प्रत्येक फेरीत प्रवाशांची क्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढेल. गर्दीच्या वेळेत ही वाढ विशेष फायदेशीर ठरणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर एकूण 211 फेऱ्या 15 डब्यांच्या लोकल आहेत त्यापैकी112 फेऱ्या धीम्या मार्गावर चालतात.
