दोन दिवसांपूर्वीच्या वादाचा वचपा
तौकीर आरीफ शेख हा कॉलेज सुटल्यानंतर मित्रांसोबत काणेनगर सर्कलवर बसलेला होता. 8 जानेवारीला त्याच्या मित्रांचा मित्र अतिफ शेख याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर अतिफने तौकीरला फोन करून धमकी दिली आणि शिवीगाळ करण्याची चेतावणी दिली.
10 जानेवारीच्या रात्री सुमारे 10:30 वाजता तौकीर त्याच्या नातेवाईकाला सायन सर्कलवर सोडून लालमिट्टी किस्मतनगर येथे परत आला. तो एका मित्राला भेटायला बोलावून आला होता. दोघे बोलत उभे असताना अतिफ शेख आला आणि तौकीर याला शिवीगाळ सुरू केली. तौकीरने शांत राहण्याचा प्रयत्न केला परंतु अतिफने रागाच्या भरात त्याला मारहाण केली. या दरम्यान तौकीरच्या मदतीला येणाऱ्या नागरिकांनाही अतिफने धमकावल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
advertisement
या घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तपास सुरु केला आहे. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
