आकर्षक कॉटन शॉर्ट कुर्ती, फक्त 200 रुपयांपासून खरेदी करा अनेक प्रकार, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या गरजा ओळखत त्यांनी आपल्या स्टॉलवर नेहमीच दर्जा आणि परवडणारे दर यांचा समतोल राखला आहे.
मुंबई : दादर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणारे राम पाटील काका हे नाव आज सगळ्यांना माहीतच आहे. मागील सुमारे 35 ते 40 वर्षांपासून ते दादरमध्ये कपड्यांचा स्टॉल लावत असून मेहनत, प्रामाणिकपणा आणि दर्जेदार माल यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या गरजा ओळखत त्यांनी आपल्या स्टॉलवर नेहमीच दर्जा आणि परवडणारे दर यांचा समतोल राखला आहे.
राम पाटील काकांच्या स्टॉलवर महिलांसाठी कॉटनचे आकर्षक आणि आरामदायी शॉर्ट कुर्ते उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 200 रुपयांपासून दर्जेदार कुर्ते येथे मिळतात. एम साईजपासून ते 4 आणि 5 एक्सएलपर्यंत विविध साईजमध्ये हे कुर्ते उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच प्लस साईजच्या महिलांच्याही गरजा येथे पूर्ण केल्या जातात. अनेक ठिकाणी मोठ्या साईजचे कपडे सहज मिळत नाहीत, मात्र राम पाटील काकांनी ही कमतरता ओळखून आपल्या स्टॉलवर त्याकडे विशेष लक्ष दिले आहे.
advertisement
या कुर्त्यांमध्ये स्लिव्हलेस, राउंड नेक, वी नेक, ॲडजस्टेबल फिट असे विविध प्रकार पाहायला मिळतात. रंगसंगतीही तितकीच आकर्षक असून साध्या रंगांपासून ट्रेंडी प्रिंट्सपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. सर्व कुर्ते हे प्युअर कॉटनचे असल्याने घालायला अतिशय आरामदायी ठरतात. एम ते डबल एक्सएल साईजचे कुर्ते 200 रुपयांत तर 3 ते 5 एक्सएल साईजचे कुर्ते फक्त 250 रुपयांत उपलब्ध आहेत, जे आजच्या महागाईच्या काळात नक्कीच दिलासादायक आहे.
advertisement
चांगला दर्जा, माफक दर आणि साईजची विविधता यामुळे राम पाटील काकांच्या स्टॉलवर नेहमीच ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. अनेक जुने ग्राहक आजही आवर्जून येथे खरेदीसाठी येतात आणि नवीन ग्राहकही एकदा खरेदी केल्यानंतर पुन्हा परत येतात. हा स्टॉल दादर स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असून सुविधांचा गल्लीत मिनी शो या स्टोअरच्या बाहेर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 4:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आकर्षक कॉटन शॉर्ट कुर्ती, फक्त 200 रुपयांपासून खरेदी करा अनेक प्रकार, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?







