विम्याच्या 80 लाख रुपयांमुळे छळ, गरोदर विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पतीसह सासरच्या नातेवाइकांनी वारंवार पैशांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरात हुंडा आणि विम्याच्या रकमेवरून एका गरोदर विवाहितेचा छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीसह सासरच्या नातेवाइकांनी वारंवार पैशांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
फिर्यादी गोदावरी घोपटे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी पल्लवी हिचा पहिला विवाह २०१५ मध्ये झाला होता. तिला एक सहा वर्षांची मुलगी देखील आहे. पहिल्या पतीचा २०२१ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर १२ जुलै २०२४ रोजी तिचा दुसरा विवाह गोपाल सहाने (रा. स्वस्तिक सिटी वडगाव कोल्हाटी) याच्याशी लावून देण्यात आला.
advertisement
लग्नात तीन लाख रोख रक्कम आणि पाच ग्रॅम सोन्याची भेट देण्यात आली होती. मात्र, पहिल्या पतीच्या विम्याची ८० लाखांची रक्कम पल्लवीला सप्टेंबर २०२४ मध्ये मिळाल्याचे समजताच तिच्यावर पैशांसाठी दबाव वाढवण्यात आला. तसेच पल्लवीच्या खात्यातून ३० ते ३५ लाख रुपये काढले असल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
इतर नातेवाईकांनाही पैशाची लालच
सासरकडील नातेवाइकांनीही आर्थिक लोभापोटी पल्लवीवर दबाव वाढवला होता. नणंद सीमाच्या विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, २० लाख रुपयांची ही मागणी पूर्ण न झाल्याने तिचा मानसिक छळ वाढवण्यात आला आणि अखेर तिला १० लाख रक्कम देण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसरी नणंद अर्चना जाधव आणि तिचा पती किशोर जाधव यांनी घर उभारणीसाठी पुन्हा २० लाख रुपयांची मागणी केली. या दोघांनीही सतत त्रास देत पल्लवीकडून मोठी रक्कम उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच नातेवाइकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
विम्याच्या 80 लाख रुपयांमुळे छळ, गरोदर विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना









