किशनगंज, 4 ऑगस्ट : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली बायको एक्स्प्रेसमधून गायब झाल्याची बातमी अलीकडेच समोर आली होती. तिच्या नवऱ्याने अक्षरशः वेडापिसा होऊन तिचा शोध घेतला होता. तिच्यासाठी अख्खी एक्स्प्रेस पालथी घातली होती आणि रेल्वे प्रशासनालाही धारेवर धरलं होतं. परंतु आता मात्र ही बायको सापडली आहे. तेदेखील पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडलं. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
advertisement
प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावं आहेत. दोघं बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राममधून शॉपिंग करताना तिला ताब्यात घेतलं. प्रिन्सने आमच्यात सारं काही आलबेल असून काहीही भांडण झालं नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस काजलला मुझफ्फरपूरमध्ये आणतील आणि न्यायालयात हजर केल्यानंतर ती पळून जाण्याचं कारण स्पष्ट होईल.
सोशल मीडियावर प्रेम, पळून लग्न, कोर्टात नोंद; मात्र, पोलिसांसमोर मोठा ट्विस्ट, काय घडलं?
मागच्या गुरुवारी मुझफ्फरपूरहून न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या आनंद विहार सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून हे नवविवाहित दाम्पत्य प्रवास करत होतं. एसी डब्यात बी 4च्या 43 आणि 45 क्रमांकाच्या सीटवर दोघं बसले होते. किशनगंज स्थानकावर एक्स्प्रेस बराच वेळ थांबली. तेव्हा काजल वॉशरूमला गेली. स्थानकातून एक्स्प्रेस निघाली तरी ती पुन्हा जागेवर आलीच नव्हती. प्रिन्सने वॉशरूमपासून आजूबाजूच्या डब्यांमध्ये तिची चौकशी केली. संपूर्ण एक्स्प्रेममध्ये शोधूनही ती सापडली नाही. मग त्याने रेल्वे अधिकाऱ्यांची मदत घेऊन याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
कमाल! YouTube वर पाहून केला जुगाड, आता वीज बिल झालं अर्ध
काजलने गुरुग्राममध्ये आपला मोबाईल बंद करून त्यातील जुना सीमकार्ड काढला आणि नवीन सीमकार्ड सुरू केला. इथेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आणि पोलिसांनी तिचं लोकेशन तपासलं. आता ती पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, विद्युत विभागात कार्यरत असलेल्या प्रिन्स कुमार याचं फेब्रुवारी महिन्यात मधुबनी जिल्ह्यातील जयनगरची निवासी असलेल्या काजलशी लग्न झालं होतं. लग्नानंतर लगेचच हनीमूनसाठी दोघं दार्जिलिंगला जाणार होते. मात्र काही कारणाने जाऊ शकले नाहीत. मग पाच महिन्यांनी ते हनीमूनला जायला निघालेले असताना ही घटना घडली.
