advertisement

कमाल! YouTube वर पाहून केला जुगाड, आता वीज बिल झालं अर्ध

Last Updated:
त्यांनी एकदा युट्यूबवर याबाबत व्हिडिओ पाहिला होता. व्हिडिओ पाहताच त्यांच्या मनात 'हा' विचार आला होता. महत्त्वाचं म्हणजे पूर्वी लोक त्यांची टिंगलटवाळी करायचे. मात्र आता या कार्यामुळे त्यांना प्रचंड मान दिला जातो.
1/5
अनेकजण मोबाईल, इंटरनेटचा वापर वेळ घालवण्यासाठी करतात. मात्र अनेकजण कामासाठी इंटरनेटचा पुरेपूर वापर करतात, तर काहीजण इंटरनेटच्या वापराने अनोखे संशोधन लावतात. मात्र समाजहित लक्षात घेऊन संशोधन करणारे फार कमी असतात. पंजाबच्या फतेहगढ साहिबमधील भाडी गावचे रहिवासी दर्शन सिंहदेखील त्यापैकीच एक. त्यांनी चक्क युट्यूबच्या मदतीने संपूर्ण परिसराचा विजेचा प्रश्न सुटावा असा शोध लावला. सध्या याबाबत जोरदार चर्चा आहे.

2/5
दर्शन सिंह यांनी अडगळीच्या सामानातून एक अशी सिस्टम तयार केली की, ज्यातून चक्क वीज निर्माण होऊ शकेल. आता या सिस्टममधून 1 किलो वॉटपर्यंत वीज निर्मित होते. विशेष म्हणजे यासाठी त्यांना केवळ 10 ते 20 हजार रुपयांचा खर्च आला. शिवाय आता ते 2 किलो वॉटपर्यंत वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पावरही काम करत आहेत.

3/5
दर्शन सिंह यांनी एकदा युट्यूबवर याबाबत व्हिडिओ पाहिला होता. व्हिडिओ पाहताच त्यांच्या मनात वीज निर्मिती करणारा प्रकल्प तयार करण्याचा विचार आला आणि त्यांनी त्यावर तातडीने काम सुरू केलं.

4/5
दर्शन सिंह यांच्या या प्रकल्पाला आता परिसरातून मागणी येऊ लागली आहे. कारण या प्रकल्पामुळे वीजेचं बिल आधीपेक्षा निम्मं झालंय, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिसरात या प्रकल्पाचा प्रचंड बोलबाला आहे.

5/5
महत्त्वाचं म्हणजे पूर्वी लोक दर्शन सिंह यांची टिंगलटवाळी करायचे. मात्र आता या कार्यामुळे त्यांना प्रचंड मान दिला जातो. लोक त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या प्रकल्पाचं कौतुक करतात.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement